Animal vaccination:Expert जनावरांच्या आजाराची लक्षणे व उपाय.
Animal vaccination:
जनावरांमध्ये अशे काही आजार आहेत त्यामुळे त्यांचा तडकाफडकी मृत्यू होतो . जनावराना हे आजार झाल्या नंतर उपचार करण्यावर पैसे खरचं करण्या पेक्षा हे आजार झालेच नाही पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. रोग होऊ नये या साथी जनावरांचे प्रतिबंधातमक लसीकरण करणे अनिवार्य आहे ॰ आपल्याला आपल्या जनावरांना अश्या आजारा पासून वाचवायच आहे त्या साथी त्यानला आधीच लस देऊन त्यांचं लसीकरण कस आणि कधी कराच याच वेळापत्रक आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.
गाई म्हशी शेळ्या मेंढया ही जनावरं घटसरपं फर्या फाशी आणि आन्त्रविषार या सारथीच्या रोगांमुळ तडकाफडकी दगावतात या रोगांची लागण झाल्या नंतर उपचार करायला वेळ मिळत नाही. त्या मूळ मोल्यवान जनावर दगावल्यामूळ पशू पालकाना मोठ नुकसान सहन कराव लागतं . मग आपले प्रिय जनावर आपली साथ सोडून निघून जातात . या गोष्टीचा आपल्याला किती जास्त फरक पडतो हे तुम्हाला माहीतचं आहे हे जनावरं आपल्या साथी फक्त जनावर नसतात ते आपल्या कुटुंबाचा एक भाग असतेत . लहान पाणी पासून आपण त्यांना मोठ केलेलं असतं मग हे अश आजार होऊन ते आपल्याला सोडून जातात ह्या गोष्टीचा आपल्या सगळ्यांनाच किती त्रास होतो . म्हणून त्यांना हे आजार होण्या आधीच लसीकरण करायचे .
पहिला आजार लाळया खूरकुत :
लाळया खूरकुत रोगा मुळे सहसा जनावरं मृत्यू मुखी पडत नाही पण ह्या रोगामुळे विशेष करून संकरीत गाई आणि म्हशी यांचा दूध उत्पादन अगदी कमी होतो अगदी शून्या वर येतो ह्या मुळे त्यांना गर्भपात होण्या ची पण शक्यता असते . ती गाई आपण पुन्हा दुधात नाही अनू शकत . हा आजार संकरीत गाई मध्ये जास्त होत होता पण ह्या आजाराच जो विषाणू आहे तो दर वर्षी बदलत चालाय आणि हा बदलत जाणारा जो विषाणू आहे तो आपल्या देशी गोवंश मध्ये पण अलिकडच्या काळामध्ये आढळत आहे . आणि हा आजार जर त्या देशी गाई मध्ये झाला तर त्या देशी गाई चे दूध उत्पादन आहे कींव्हा प्रजोतपादनाचा जो कार्य आहे त्या कार्यावर बराच फरक पडतो . त्या मुळे पण मोठ आर्थिक नुकसान होत . हा आजार संसर्गजन्य असल्याने एका जनावराकडून दुसऱ्या जनावरास सहज लागण होते . दरवर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात लाळ्या खुरकूत या आजाराची सुरवात होते. हा आजार जून महिन्यापर्यंत दिसून येतो; परंतु पशुपालक या गोष्टीकडे पाहिजे तेवढ्या गांभीर्याने लक्ष देत नाहीत Animal vaccination कडे लक्ष द्या आणि Expert बना.
आजाराची कारणे :
ज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत, त्यांना हा आजार होतो. यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांचा समावेश होतो. गाई व म्हशींना या रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त असती.
आजाराची लक्षणे :
या रोगाचा संक्रमण काळ दोन ते 12 दिवस आहे. आजारी जनावरास ताप येतो व तोंडामध्ये, खुरांच्या बेचक्यात व कासेवर फोड येतात. या फोडांमुळे जनावर तोंडातून सारखी लाळ गाळते. कालांतराने हे फोड फुटल्यानंतर तेथे जखमा तयार होतात. जिभेवरील वरचा थर पूर्णपणे सोलपटून निघतो. यामुळे जनावर अन्न, पाणी वर्ज्य करते. साहजिकच अधिक थकवा येऊन रूक्षपणा जाणवतो. खुरावरही अशा प्रकारचे फोड येत असल्याने जनावर चालताना लंगडते .
आजाराचा उपचार :
यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पोटॅशिअम परमॅंग्नेटने किंवा खाण्याच्या सोड्याने तोंडामध्ये व शरीरावर इतर ठिकाणी आलेले फोड धुऊन घ्यावेत . जिभेवर मऊपणा येण्यासाठी बोरो ग्लिसरीन अथवा लोणी अथवा खोबऱ्याचे तेल व हळद एकत्र करून लावावे. खुरांवरील जखमाही पोटॅशिअम परमॅंग्नेटच्या पाण्याने धुऊन त्या ठिकाणी मोरचूद व झिंक ऑक्साईड सारख्या प्रमाणात घेऊन मलम करून लावता येऊ शकते. याबरोबरच शरीराचा दाह कमी करणारी वेदनाशामक औषधे व प्रतिजैविके चार – पाच दिवस पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार देणे गरजेचे आहे. जखमांमध्ये अळ्या पडू न देणे महत्त्वाचे आहे
दूसरा आजार घटसर्प :
घटसर्प हा जिवाणूजन्य आजार आहे . पावसाळ्यात ह्या आजाराचा जास्त प्रादूरभाव दिसून येतो . ह्या आजाराची लागण झाल्यावर जनावरामध्ये खूप जास्त आणि सोम्य अशे दोन प्रकारचे लक्षणं दिसून येतात बर्याच वेळा लक्षणं दाखवण्या आधीच जनावरं दगावतात .घटसर्प हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.विशेषतः म्हशींमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळतो.हा रोग ‘पाश्चुरेला मल्टोसिडा’ या विषाणूंमुळे होतो.
आजाराची लक्षणे :
या रोगाचे जंतू जमिनीत, जनावराच्या नाकपुड्यात व श्वासनलीकेत असतात. रोगी जनावराचे नाकातोंडातून वाहणाऱ्या स्त्रावामुळे व दूषित चाऱ्याद्वारे हा रोग पसरतो या रोगामुळे जनावरास फार ताप येतो.घशास सूज येते.श्वासोच्छवास जलद रितीने होतो.जनावराचे डोळे लाल होतात.ते सतत वाहतात. जीभ बाहेर येते. नाकातून शेंबडासारखा स्त्राव बाहेर पडतो व लाळ वाहते. कोणत्या कोणत्या जनावरांना काही वेळेस रक्ताची हागवण होते व अंगावर सूज येते.
लस कधी द्यावी:(Animal vaccination)
एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी . (संकरित गाईना वर्षातून दोन वेळेस द्यावी).
तिसरा आजार फर्या :
फर्या साधारणपणे ६ ते २४ महिने वयोगटातील जनावराणमध्ये फर्या आजाराचा प्रदूरभाव जास्त प्रमानात दिसून येतो . फऱ्या हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.हा एक सांसर्गिक रोग आहे.विशेषकरून धष्टपुष्ट जनावरांना .
कुरणात चरणारी जनावरे,तसेच पाणथळी व दलदलीच्या जमिनीत चरणाऱ्या जनावरांना या रोगाची लागण होते.याचे जंतूंनी प्राण्याच्या शरीरात प्रवेश केल्यावर काही काळ ते सुप्तावस्थेत राहतात.त्यांच्या वाढीस अनुकूल वातावरण मिळाल्याबरोबर ते आपला प्रभाव दाखवितात .
आजाराची लक्षणे :
रोगी जनावरास ताप येणे,जनावराचे मांसल भागावर विशेषतः फऱ्यावर(), मानेवर किंवा पाठीवर सूज येते.सूजेच्या ठिकाणी दाबल्यावर चरचर असा आवाज येतो.सुजलेला भाग काळा दिसतो. जनावर हळूहळू काळवंडते. त्याच्या शारीरिक क्रिया मंद होतात व नंतर मृत्यू ओढवतो .
लस कधी द्यावी:(Animal vaccination)
एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी .
हे पण वाचा :https://kisansahyog.com/navardev-bsc-agri-1st-best-movie/
One response to “Expert Animal vaccination:5 जनावरांच्या आजाराची लक्षणे व उपाय”
[…] […]