Best Agriculture Machine: कांदा लागवड करणे झाले आता सोपे आणि सुलभ.
Best Agriculture Machin
Best Agriculture Machine:
महाराष्ट्रात कांदा लागवडीच्या वेळेस मजूर टंचाई होते . याचा सामना बर्याच शेतकर्यांना करावा लागतो यावर उपाय म्हणून एक सारखं लागवड करणारं हे यंत्र अहमदनगर च्या दोन तरुणांनी बनवलं आहे . हे तरुण एका शेतकरी कुटुंबातील दोन मुलं सौरब कदम आणि प्रशांत देशमुख हे दोघं आहेत . हया मुलांचं जितकं कौतुक कराव तितकं कमीच आहे . आता हे मूल शेतकरी कुटुंबातले आहेत महणून त्याना पण माहीत आहे कांदा लावतांनी किती त्रास होतो . आता तुमचा पण त्रास कमी करण्यासाठी हे यंत्र आहे. आता तर ह्या यंत्राला आफ्रिकेतून डायरेक्ट मागणी आली आहे.आणि या दोन शेतकरी पुत्रांनी मिळून बनवल आहे हे यंत्र खूप अभिमान वाटतो जेव्हा गावाकडची मुल शिक्षण घेऊन गावकड येऊन आधुनिकयंत्रणांचा वापर करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात त्यांची काम सोपी करतात ह्या दोन शेतकरी पुत्रांच विशेष कौतुक वाटत.
कांदा लागवड यंत्राचे फायदे (profit Agriculture Machine):
हे यंत्र वापरुन तुमची जवळजवळ मजुरी मध्ये ५०% बचत होऊ शकते . फक्त बचतच नाही होत आहे तर आपलं उत्पन्न पण वाढण्यास मदत होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ,हे कस शक्य आहे ! पण हे शक्य आहे कारण दोन शेतकरी पुत्रांनी मिळून एक उत्कृष्ट असे यंत्र बनवले आहे त्यामुळे आपल्या कमी क्षेत्रा मध्ये जास्त रोप लागवड करण्यास हे यंत्र मदत करते त्याने आपल्या उत्पन्ना मध्ये निश्चितच वाढ झालेली आपल्याला दिसून येईल कारण रोप संख्या पण वाढली जाणार आहे . अडीच ते तीन लाख रोप एक एकर मध्ये लावली जाऊ शकतात.आपण सर्व शेतकरी आपल्याला माहितच आहे कांदा लागवड करणे काम किती अवघड आहे.त्या साठी खूप सारे मजूर लागतात,आणि आत्ता सध्या मजुरांची किती टंचाई आहे,आणि वेळ पण खूप लागतो,दिवस दिवस भर खाली वाकुण काम कारव लगतं .पण आता वेळ आली आहे नियोजन बद्ध शेती करायची हे यंत्र वापरुन तुम्ही दिवस भर खाली बसून काम करू शकतात जास्त काष्ट करावे लागणार नाही.हे यंत्र वापरल्या मूळ आपली मजुरी तर कमी होती पण जे मजूर काम करतेत आपल्या शेतात त्यांना पण कमी कष्ट करावे लागतात.आता साधारण पणे सगळी कडे पारंपरिक शेती केली जाते पण आता आधुनिक शेती कडे जास्त भर दिला पाहिजे. त्या पद्धती मध्ये खूप कष्ट आणि त्रास पण खूप आहे.यंत्र नं वापरता जर आपण आपल्या पारंपरिक पद्धतींनी जर रोप लावले तर फक्त जवळजवळ साधारण पणे दीड ते पाहुणे दोन लाखचं रोप लावू शकतेत.पण यात्रांचा वापर करुन भरगोस उत्पन्न काढू शकतो.
(कांदा लागवड यंत्र) कसं काम करतं:
हे यंत्र अवघ्या 5 तासात एक एकर कांदा लागवड होते. हे यंत्र वापरुन लागवड केल्या नंतर ही दोन रोप आणि दोन ओळी मधलं अंतर अचूक राहतं म्हणजेच काय हे यंत्र मजुरान सारखीच लागवड करतं. विशेष गोष्ट अशी आहे ह्या यंत्राची की हे कांद्याच मूळ वजन , आकार आणी रंग पण टिकवून ठेवतं . एकदम जशे मजूर पेरणी करतात तशीच पेरणी हे यंत्र पण करतं . कांद्याच्या दोन ओळीन मधलं अंतर एकसारखाच असतं . दोन ओळीन मधलं अंतर चौरस असतं.त्यामुळं कांद्याच पोषण उत्तम पद्धतिने होण्यास मदत होते.आणि कांद्याच पोषण योग्य तस होत आणि त्यामुळे भाव चांगला भेटू शकतो.
कांदा लागवड यंत्र बद्दल माहिती :
त्या यंत्रा मध्ये अस आहे की एक सोबतच बेड पण पडणार आहे आणि साध्या वाफेची पण सोई केली आहे . बरेच शेतकरी जे आहेत ९५% टक्के शेतकरी अशे आहेत जे ठिबक आईवाजी साध्या वाफेची रोप लवतेत . हे यंत्र कांदा लावतो त्याच्या ओळीन मधलं अंतर साडे पाच बाय साडे पाच आहे आणि दोन रोपाण मधलं अंतर पाण साधे पाच बाय साडे पाचचं आहे . आपण हे यंत्र चार बाय चार इंचा वर लावून पण पेरणी करू शकतात .अजून पण अंतर कमी जास्त करायचं असण तर ते आपण यंत्रा वर करू शकतात.म्हणजेच ह्या यंत्राच्या मदतीने आपण आपल्याला हव तस सेटिंग करून लागवड करू शकतो. ह्या यंत्रा मुळ कांदा लागवड खूप सुलभ झाली आहे तरी त्यांनी सर्व विचार करुनच यंत्र बनवल आहे.तरी हे यंत्र नगर मधील राहुरी मध्ये भेटून जाईल. अधिक माहिती साठी संपर्क करा आणि आधुनिक शेती ला प्राधान्य द्या.