“समृद्ध शेती, समृद्ध भविष्य! साथी बना, किसान सहयोग!”

1st best कांदा रोग उपचार : कांदा वाचवायचा असेल तर हे वाचा,खूप नुकसान वाचवू शकता.

1st best कांदा रोग उपचार : कांदा वाचवायचा असेल तर हे वाचा,खूप नुकसान वाचवू शकता.

1st best कांदा रोग उपचार : कांदा वाचवायचा असेल तर हे वाचा,खूप नुकसान वाचवू शकता.

भारतात पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये कांदा ही अत्यंत महत्त्वाची फळभाजी  आहे.त्यामुळेच कांद्याला बाजारात नेहमीच मागणी राहते. त्याच वेळी, आपण कांद्याशिवाय चवदार भाजीची कल्पना देखील करू शकत नाही. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करतात. देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. कांद्यामध्ये अनेक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म देखील आढळतात.पण कांद्याची लागवड करत असताना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते त्यात अनेक रोग पण कांदा पिकातील पीळ, मर पाडणे, करपा अश्या रोगा पासून नियंत्रण करण्यास मदत करण्याचा एक छोटासा प्रयत्न या ब्लॉग मार्फत करणार आहोत.

 

कारणे:कांदा रोग उपचार:

कांदा रोग उपचार रोग होण्याची कारणे खूप आहेत पण मुख्य कारण आहे आपण कांदा पिकाची लागवड पात कापून करतो शेतकरी मित्रांनो मग त्या पाती मधे ओलावा साचून बुरशी तयार होते आणि मग त्या ओलाव्या मूळ पात सडून मर येते.मग ह्या रोगाचे निवारसन करणे खूप गरजेचे आहे तर आणि अजून एक मुख्य कारण अस आहे की सुरुवातीलाच काही शेतकरी नत्राचा अतिरिक्त वापर करतात आणि त्या मुळे सुद्धा पिक वर रोग येण्याची शक्यता असते.तर या साठी ह्या ब्लॉग मधून उपाययोजना समजून घेणार आहोत आधीच काळजी काय घ्यावी हे पण समजून घेणार आहोत.

उपाययोजना:

शेतकरी मित्रांनो आपण पाहील तर हा रोग होऊ नये या साठी कार्बो कार्बेन्डाझिम 50% डब्लू पी २.५ ग्राम पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करावे आणि कांद्याची लागवड करण्या पूर्वी कांद्याच्या रोपांचे मूळ त्या पाण्यात भिजवून घ्यावे ५ मिनिट आणि मग त्या रोपांची लागवड करावी.कार्बेन्डाझिम हे एक बुरशी नाशक आहे.लिंबूवर्गीय,केळी,स्ट्रॉबेरी,अननस अश्या अनेक पिकावर कार्बेन्डाझिम याचा रोग नाशक म्हणून वापर केला जातो.तर हा झाला मुद्दा की रोग होउच नये या साठी काय करावं रोग होण्याच्या आधी काळजी घेतलेली कधीही उत्तम ठरते.त्यामुळं नेहमी ही काळजी तुम्ही रोपांची लागवडी पूर्वी घ्या.

उपचार :

मर:मातीमध्ये ओलावा जास्त असेल आणि लागवड झालेली आहे आणि पिकावर मर रोग येत आहे तर या मर रोगा साठी आपण ह्युमिक एसिड (४०० ग्राम)यात अधिक सिलिकॉन (२०० मिली) घ्यायचा आहे.आणि कार्बेन्डाझिम + मॅकोझेब हे बुरशी नाशक ४०० ग्राम घ्यायचा आहे २०० लिटर पाण्या मध्ये एकत्र करायचं आहे आणि कांदा पिकामध्ये आळवणी करायची आहे किंवा ड्रिप द्वारे सोडू शकता.याने आपण नक्कीच पिकावर येणाऱ्या मर वरती मात करू शकतो.मर रोग होऊ नये म्हणून जे उपाय केले जातात त्यामुळे हा रोग टाळता येतो.एकाच शेतात वर्षानुवर्षे कांद्याची लागवड करू नये.कांद्याची तृणधान्यासोबत फेरपालट करावी.खरिपातील लागवड नेहमी पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या जमिनीत करावी.उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी.रोपाची मुळे लागवडीपूर्वी कार्बेन्डाझीम द्रावणात १ ते २ मिनिटे बुडवून घ्यावीत. त्यासाठी २० ग्रॅम कार्बेन्डाझीम १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.

करप्या:कांदा या पिकावर येणार हा एक कांद्या वर पडणारा करप्या या साठी प्रतिबंधक उपाय प्रतिकार वाण (अनेक उपब्ध आहेत).पाने जास्त काळ ओली राहू नयेत म्हणुन वाऱ्याच्या वाहत्या दिशेने लागवड करा.हवा चांगली खेळती रहाण्यासाठी रोपांची दाटी कमी करा.लागवडीपूर्वी शेतातुन पाण्याचा निचरा चांगला होत असण्याची काळजी घ्या.झाडीची दाटी कमी करण्यासाठी नत्रयुक्त खतांचा जास्त वापर टाळा.काढणीनंतर रोपांचा कचरा काढुन अवशेष गाडा.३-४ वर्षांसाठी पीक फेरपालट करा.कार्बेन्डाझिम + मॅकोझेब हे सयुक्त बुरशिनाशक ३० ग्राम होऊ शकता अधिक याच्या मध्ये समुद्र शैवाल अर्क (प्राईम ७५२५ बायोप्राईम )३०मिली द्यायचा आहे या दोन्ही घटकांचा प्रमाण प्रति पंपा साठी आहे.आणि या पिकाची फवारणी करायची आहे.

कांद्यावरील तपकिरी करपा (Stemphylium blight)उपाय:वातावरण उपयुक्त ठरत असल्यामुळे बुरशीनाशके प्रभावीपणे काम करु शकत नाहीत. तरीही पिकाची फेरपालट, बीजप्रक्रिया, रोपे लावताना कार्बेन्डाझीमच्या द्रावणाचा वापर इ. बाबींमुळे रोगाची तीव्रता कमी करता येते.दर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने 0.2% कार्बेन्डाझीमची फवारणी करावी फवारणीमध्ये चिकट द्रवाचा वापर अवश्य करावा. तसेच एका शिवारात सर्व शेतकर्‍यांनी फवारणी एका ठराविक काळात केली तर रोगाचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते.

जांभळा करपा (Purple blotch):अश्या प्रकारचे अनेक रोगा मुळे खूप नुकसान.होतजगातील सर्व देशांत जेथे कांदा होतो तेथे या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते हा रोग पिकांच्या कोणत्याही अवस्थेत येतो. या रोगामुळे पिकाचे ५० ते ७० टक्के नुकसान होते.जांभळ्या करप्याचे प्रमाण खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात असते रोपवाटिका तसेच पुनर्लागण झालेल्या पिकावर आणि बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांदा पिकावरदेखील प्रादुर्भाव होतो.१८ ते २०० सें. तापमान व ८० टक्के आर्द्रता या रोगाच्या बुरशीवाढीस पोषक असते.रब्बी हंगामात जाने-फेब्रुवारी महिन्यात पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण असेल तर या रोगाची तीव्रता अधिक होते.रांगड्या हंगामातील कांद्यावरदेखील या रोगाचा बराच प्रादुर्भाव होतो.

हे पण वाचा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *