best Soil testing : असे करावे माती परीक्षण.
माती परीक्षण (best Soil testing) : माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. माती परीक्षणाच्या नोंदी राखणाऱ्या पत्रिकेस ‘मृदा आरोग्य पत्रिका’ असे नाव आहे.
अनेक शेतकरी माती परीक्षण करतात पण काही शेतकरी माती परीक्षण वेळेवर करीत नाही . काही शेतकर्याना आपण माती परीक्षण कोणत्या उदेशान करतो हेच माहीत नसतं . म्हणून त्यांना माती परीक्षणाचा म्हणाव तसा फायदा होत नाही . माती परीक्षण आपण नेमक कोणत्या उदेशान करणार आहोत हे माहिती असलं पाहिजे कारण उदेशानुसार माती परीक्षणाचा नमूना घेण्याची पद्धत वेगळी असते . त्या नुसार शेतातून मातीचा नमूना घेण्याची पद्धत ठरवावी लागते . शेता मधील माती साधारण ताहा तीन उदेशा साथी तपासली जाते .भारतात या मातीचे परीक्षण भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागातर्फे करण्यात येते व त्यानंतर मृदा आरोग्य पत्रिकाही मिळते .
(best Soil testing)
माती तपासण्याचा पहिला उदेश :
पहिला उद्देश म्हणजे विविध हंगामी पिके म्हणजे तुम्ही जर अन्नधान्य पिके, भाजीपाला किंवा फुल पिके जर घेणार असाल तर या पिकाच्या खत नियोजनाच्या दृष्टीने माती परिक्षण कराव लागत .
माती तपासण्याचा दूसरा उदेश :
दुसरा उद्देश बहूवर्षीक म्हणजे लिंबू, आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ आणि चिकू यासारखी फळपिके घेणार असाल तर या फळपिकांच्या खत नियोजनासाठी माती परिक्षण करावं लागत .
माती तपासण्याचा तिसरा उदेश :
तिसरा उद्देश नविन फळबागेची लागवड करणार असाल तर त्यासाठी आपली जमीन योग्य आहे किंवा नाही हे तपासण्याची गरज असत .ह्या उदेशा नुसार माती परीक्षणाचा नमूना घेऊन माती परीक्षण केल तर त्याचा नक्की फायदा होतो . हा झाला माती परीक्षणाचा उदेश आता बघूया माती परीक्षण नेमका केव्हा करायच या बद्दल ची माहिती .
माती नमूना घेण्याची वेळ :
मातीचा नमुना शक्यतो खरीप किंवा रब्बी पिकाच्या काढणीनंतर जमीन नांगरणी करण्याआधी आणि कोरडी असताना घ्यावा. कारण माती परीक्षण अहवाल पुढील हंगामातील पेरणीपूर्वी उपलब्ध होणे गरजेचे आहे. म्हणजे त्यानुसार खतांचा नियोजन करण सोप जात. प्रयोगशाळेत नमुना दिल्यानंतर साधारणपणे अहवाल मिळण्यासाठी एक महिन्याचा वेळ लागू शकतो. ते गृहीत धरून मातीचा नमुना प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठवावा. माती परिक्षणाच्या प्रयोगशाळा जवळचे कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र याठिकाणी असतात. या ठिकाणी माफक शुल्कामध्ये माती परिक्षण करून अहवाल मिळतो. काही शहरामध्ये खासगी प्रयोगशाळेतही मातीपरीक्षण करुन मिळत . माती परिक्षणाचा अहवाल मिळाल्यानंतर तो त्या ठिकाणच्या शास्त्रज्ञांकडून समजून घ्यावा. विशेष करुन आपण कोणती पिके घेणार आहोत त्यानूसार खत नियोजनाची माहिती घेण्याचा प्रयत्न करावा. माती परीक्षण अहवालाची वैधता ही साधारणपने दोन ते तीन वर्षांपर्यंत असते. त्यानंतर पुन्हा माती परिक्षण कराव. यामध्ये पाण्याची सोय असलेल्या शेतात वर्षातून दोन किंवा जास्त हंगामात पिके घेत असाल तर अशा शेताचे माती परीक्षण दर दोन वर्षांनी कराव. आणि जर तुम्ही वर्षातून फक्त एकाच हंगामात पीक घेत असाल तर अशा शेताचे दर तीन वर्षांनी माती परीक्षण कराव. अश्या प्रकारे योग्य वेळी माती परीक्षण करून माती परीक्षणाचा अहवाल समजून घेऊन खत नियोजन केल तर माती परीक्षांचा नक्कीच फायदा होतो .
काय-काय परीक्षण करण्यात येतेसंपादन
सर्वसाधारण नमुनेसंपादन
यामध्ये नत्र,पालाश व स्फुरद या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या नमुन्यात किती प्रमाण आहे हे बघितले जाते. तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक याचीही तपासणी केली जाते.
सूक्ष्म मूलद्रव्य नमुनेसंपादन
यात शेतातील मातीत असणाऱ्या तांबे, लोह , मॅंगनीज , जस्त या सूक्ष्म मूलद्रव्यांची तपासणी करतात.
विशेष परीक्षणसंपादन
यात मुक्त चुना, सेंद्रिय कर्ब, आर्द्रतेचे प्रमाण, कायिक गुणधर्म आदी गोष्टी तपासण्यात येतात. तसेच मातीत असलेल्या जाड रेती, बारीक रेती, चिक्कण माती, पोयटा आदी घटकांचे शेकडा प्रमाण काढले जाते.त्यासोबतच आम्ल-विम्ल निर्देशांक, मातीची विद्युत वाहकता,कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम (पालाश), स्फुरद आदी घटकांचीही तपासणी करण्यात येते.यासमवेतच शेतातील विहिरीच्या किंवा नमुना दिलेल्या पाण्यात आढळणाऱ्या विविध खनिजांचे व घटकांचे प्रमाणही काढले जाते.
माती परीक्षणमध्ये ((best Soil testing)) खालील घटकांची तपासणी केली जाते –
मृदा तपासणी कृषि प्रयोगशाळेद्वारे केली जाते. प्रयोगशाळेतील चाचण्या ह्या 4 प्रकारांमध्ये वनस्पतींच्या पोषक तत्वांचे परीक्षण करतात.
1. महत्वाचे पोषक – नायट्रोजन(N), फॉस्फरस(P), पोटॅशियम(K)
2. माध्यमिक पोषक – कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर
3. सूक्ष्म पोषक – बोरॉन (boron – B), क्लोरीन (chlorine – Cl), तांबे (copper – Cu), लोह (iron – Fe), मॅगनीज (manganese – Mn), मोलिब्डेनम (molybdenum – Mo) आणि जस्त (zinc – Zn).
4. अतिरिक्त घटक – सामू (ph), सेंद्रिय कर्ब (organic carbon), चुनखडी (Calcium carbonate), विद्युत वाहकता (electric conductivity) इत्यादि.
(best Soil testing)
3 responses to “best Soil testing : असे करावे माती परीक्षण.”
सर्व शेतकर्यांसाठी खुप उपयुक्त माहिती जमिनीचा पोत योग्य राखला जाईल व खर्च योग्य प्रमाणात होईल शेतकर्यांचे उत्पादन वाढेल
Very well
[…] best Soil testing : असे करावे माती परीक्षण. […]